Advertisement
मंगळवेढा :
सध्याची समाजाची स्थिती पाहता संतांचे विचारच समाजाला तारू शकतात , असे प्रतिपादन
युवा किर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.
"सावली फाउंडेशन'च्या
अध्यक्षा स्व. अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अनुसंध्या या
कार्यक्रमातील कीर्तनात ते जनसमुदयास मार्गदर्शन करीत होते. हभप चैतन्य महाराज
वाडेकर यांनी कीर्तनातून समाज व्यवस्थेवर प्रहार करताना केला. ते म्हणाले की,
अभंगाचा आधार घेऊन किर्तनातून वैचारिक प्रबोधन होऊन देखील समाजात अपेक्षित बदल होत
नाहीत. समाजाला परमार्थिक असण्यापेक्षा परमार्थिक दिसण्यात महत्त्वाचे वाटते,
त्यामुळे समाजामध्ये अपेक्षित बदल होत नाहीत. करमणूक व मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकतो.
परंतु घरी जाताना यातून एक मौलिक विचार या कीर्तनातूप घेऊन जावा. त्यांनी आजच्या
पिढीसमोर तुकोबारायांच्या विचारतील मर्म मांडले.
यावेळी या कार्यक्रमाचे
शुभारंभ सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, बबनराव आवताडे,
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, अब्राहम आवळे, क्रांती आवळे, अजय साळुंखे, ऍड. कोमल
साळुंखे-ढोबळे, रतन चंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
लतीफ तांबोळी, उद्योगपती हनुमंत दुधाळ, शिक्षण प्रसाक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुजित
कदम, बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, स्वीय सहाय्यक विशाल खंदारे,
शिवानंद माळी, मुख्याध्यापक विश्वंभर काळे, मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार,
मुख्याध्यापक प्रवीण गुंड, मुख्याध्यपक अंबादास पांढरे, कृष्णदेव चौगुले, बसवराज
कोरे, कांतीलाल इरकर, अप्पसाहेब काटकर, शशिधर पाटील, मारूती वाघमारे, कृष्णदेव
चौगुले, आदींसह शाहु परिवार व सावली फाउंडेशनचे सदस्य तसेच मंगळवेढा तालुक्यातील
हजारो भाविक उपस्थित होते.
