Advertisement
नाशिक : शिक्षण हा आपल्या यशस्वी आयुष्याचा पाया असतो, त्यामुळे जीवनात
भरपूर शिका, शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊनच स्व. अनुराधा ढोबळे यांनी प्रा.
लक्ष्मणराव ढोबळे यांना सावली सारखी साथ-सोबत करीत शिक्षण संस्था उभारण्यास
प्राधान्य दिले, असे प्रतिपादन नाशिक बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष अंबादास आहिरे
यांनी केले.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव
ढोबळे यांच्या पत्नी तथा सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा स्व. अनुराधा ढोबळे यांच्या
जयंतीनिमित्त वंडर स्टार स्कूलमध्ये त्यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी आहिरे बोलत होते. ते म्हणाले की, लहान मुले ही निरागस असतात त्यांचे मन
प्रांजळ असते तशीच काहीशी भावना स्व. अनुराधा ढोबळे यांची होती. याच भावनेतून
त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी करण्यात लक्ष्मणराव ढोबळे यांना मोलाची साथ दिली,
असेही आहिरे यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवर तसेच शिक्षिका यांच्या हस्ते
स्व. अनुराधा ढोबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बहुजन रयत
परिषदेचे नाशिक उपाध्यक्ष यमनजी काळे, साहेबराव शिंगार, पाटील साहेब यांच्यासह वंडर
स्टार स्कूलमधील शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
