#

Advertisement

Thursday, December 1, 2022, December 01, 2022 WIB
Last Updated 2022-12-01T17:39:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रातून जाता? जा.., त्याची जाहिरातबाजी करू नका : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे

Advertisement

सोलापूर : महाराष्ट्र लेचापेचा नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मान्यवरांनी या मराठी भूमीची सेवा केली आहे. या मातृभूमीला लाथाडून आम्ही जातो असे म्हणताय..? जा, पण त्याची जाहिरातबाजी करू नका, आईवर हात उगारू नका, अशी विनंती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील 28 गावांनी कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तसा ठरावही या गावांनी संमत केला. याविषयी ढोबळे यांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केली. माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मण ढोबळे हे जिल्हा परिषदेमध्ये आले असता ते पत्रकांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी सीमावर्तीय भागातील नागरिकांच्या भूमिकेवर संताप व्यक्‍त केला. ते म्हणाले की, अलमट्टी धरणाचे पाणी सातत्याने महाराष्ट्राला त्रास देते. आम्ही सहन करतो, सख्खे भाऊ पक्के वैरी असल्याचे भासवले जात आहे. कधी नांदेड बॉर्डर, कधी अक्कलकोट बॉर्डर तर कधी जत बॉर्डर उठून उभे राहते. हे का आणि कशासाठी तसेच कोण करतेय, हे जाणून घ्या आणि त्यानंतर महाराष्ट्रा बाहेर पडण्याचा विचार करा. हे एवढे सोपे नाही, असेही ढोबळे यांनी नमूद केले.