#

Advertisement

Saturday, December 3, 2022, December 03, 2022 WIB
Last Updated 2022-12-03T11:33:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवा, आपआपल्या परीने पाहून घेऊ !

Advertisement

रायगड : कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नका, आपलं कोणतंही स्वार्थ नाही. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. आज व्यथित होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन बांधणी करायची आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी इशारा दिला.
'छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या या विधानाविरोधात उदयनराजे यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे. ज्यांनी सर्वधर्माचा आदर करण्याचा संदेश महाराजांनी दिला. त्याच व्यक्तीचा राज्यात विटंबना होत आहे. चित्रपट असेल, लिखान असेल आणि वक्तव्य असेल. पण सगळे जण शांतपणे बसले आहे. नंतर सांगता अप्रत्यक्षपणे बोलल्याचं सांगता, त्यांचं समर्थन करण्याचे धाडस करताय, पण कोण कुठं गेलं, काय गेलं याला अर्थ नाही, हे अजिबात सहन केले जाणार नाही. आपण मुग गिळून गप्प बसलो आहे. यावर आपण काही प्रतिक्रिया देत नाही, आता आपण प्रतिक्रियावादी झालो आहे, हे देशासाठी घातक आहे, असंही उदयनराजे म्हणाले.
शिवरायांनी सर्वधर्मीयांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचं काम आहे. शिवरायांनी आपलं आयुष्य राज्यासाठी वेचलं. त्यांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. शिवरायांना वंदन करायचं पण त्यांनी दिलेल्या सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला जात नाही. राजकीय पक्षांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे, अशी टीका उदनयराजेंनी केली.