#

Advertisement

Saturday, December 3, 2022, December 03, 2022 WIB
Last Updated 2022-12-03T11:20:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बेळगावसाठी गुवाहाटीला नवस मागा ? उद्धव ठाकरेंचा टोला

Advertisement



मुंबई : 'कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आणि आमचा मुख्यमंत्री गुवाहाटीवरून येत आहे, आता गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला जात का नाही. सगळ्या आमदार, मंत्र्यांना घेऊन गुवाहाटीला गेलं पाहिजे, तिकडे जाऊन बेळगाव जर पदरात पडत असेल तर सगळे प्रश्न नवस करून फेडले पाहिजे. कर्नाटकने आपल्या धरणात पाणी सोडलं आहे, पण यांचा हा नेंभळटपणा कायम आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल आणि आमचा मुख्यमंत्री गुवाहाटीवरून येत आहे, आता गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला जात का नाही. सगळ्या आमदार, मंत्र्यांना घेऊन गुवाहाटीला गेलं पाहिजे, तिकडे जाऊन बेळगाव जर पदरात पडत असेल तर सगळे प्रश्न नवस करून फेडले पाहिजे. कर्नाटकने आपल्या धरणात पाणी सोडलं आहे, पण यांचा हा नेंभळटपणा कायम आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.