Advertisement
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. आता भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांना सुद्धा तोंडावर शाई फेकणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांच्या विधानावर भीम आर्मीने आक्षेप घेतला आहे. आमच्या महिला ब्रिगेड चित्रा वाघ यांचे शाईने तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराचा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
