Advertisement
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र विमानाने निघाले होते. पण खराब हवामानामुळे विमानाला माघारी परतावे लागले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला आहे.
गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा आज समारोप आहे. गेल्या पाच दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.. या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित झाले आहेत. आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी विमानाने निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
