#

Advertisement

Friday, January 27, 2023, January 27, 2023 WIB
Last Updated 2023-01-27T11:42:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

भोसरीत प्रजासत्ताक दिनी शाहू शिक्षण संस्थेचा परिसर दुमदुमला

Advertisement

भोसरी : येथील शाहू शिक्षण संस्था संचलित अनुलक्ष गृप ऑफ इन्स्टिट्यूट, राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज,ओआसिस इंग्लिश मिडीयम स्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कसरतीचे खेळ व लेझीम सादर केले. तसेच, प्रभातफेरी, नृत्य, समूहगीत, देशभक्तीपर गीत, विद्यार्थ्यांची भाषणे, मानवी मनोरे आदी उपक्रम यावेळी घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ, मानसशास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर काटे, महाराष्ट्र ऑलम्पीक संघटनेचे सदस्य, उद्योजक अजय साळुंखे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मान्वरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ऍड. जयश्री कुठे मॅडम, सचिव ऍड. प्रमिला गाडे, ऍड. मंगेश खराबे यांच्यासह असोसिएशनचे सदस्य, स्कूलच्या प्रभारी प्राचार्य शुभा पिल्ले मॅडम, प्रफुल्लता जगताप सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभक्‍तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली, याबाबत विविध दाखले देत ऍड. कोमल साळुंखे यांनी यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले.
प्रमुख पाहुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ यांनीही विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, समूहगीत, देशभक्‍तीपर गीत, भाषण, मानवी मनोरे हे कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले. प्रजासत्ताकाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे तसेच विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहाने प्रजासत्ताक दिन सोहळ्यास रंगत आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी शाळा परिसर दुमदुमून गेला होता.प्रस्ताविक, सूत्रसंचालन आदी जबाबदारी शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांभाळली. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.