#

Advertisement

Friday, January 27, 2023, January 27, 2023 WIB
Last Updated 2023-01-27T11:54:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोलापुरात पठाणला विरोध, पोस्टरही फाडले

Advertisement


सोलापूर : सोलापुरात हिंदुराष्ट्र सेना आणि बजरंग दलाने पठाण चित्रपटादरम्यान चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत पठाण  चित्रपटाला विरोध केला. तसेच चित्रपटाचे पोस्टर फाडले. पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी करत चित्रपटगृह बंद पाडण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला.  उमा चित्रपट गृहाच्या बाहेर हा प्रकार घडला.
देशात  पठाण हा अभिनेता शाहरुख खानचा सिनेमा  25 जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात रिलीज झाला. मात्र, पठाण रिलीज होताच मराठी सिनेमांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सोलापुरात हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आक्रमक झाल्या आहेत. याठिकाणी पठाण चित्रपटाचे बॅनरही फाडण्यात आले.  पोलिसांनी हिंदूराष्ट्र सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन हा वाद निर्माण झाला होता.  हा चित्रपट रिलीजपूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.