Advertisement
सोलापूर : सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात 12 काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर दोन काळवीट जखमी झाले आहेत. देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने चाळीस फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना उपचारासाठी दाखल केले आहे.
केगाव विजापूर महामार्गावर बायपास रोडवरील अंडरपास बोगदा झाला आहे. या बोगद्यावरून सायंकाळच्या सुमारास काळवीट्यांचा एक कळप पुलावर चढला. काळविटाच्या कळपाला अंडरपासचा उंचीचा अंदाज न आल्याने साधारणपणे चाळीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृत पावलेल्या काळवीट वनविभागात घेऊन गेले आहे. माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहचलो. येथे दहा ते 12 काळवीट रस्त्यावर पडलेले आढळले. यातील दोन काळवीट जिवंत होते. यानंतर आम्ही लगेच वनविभागाशी संपर्क साधून हे दोन काळवीट त्यांच्या ताब्यात दिले. तर उर्वरित मृत काळविटांना गाडीत भरुन नेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली आहे.
