Advertisement
मुंबई : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केलीये. फक्त सही करुन आल्यावर कामं होतं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या कंपन्यांसोबत MOU करून आले त्या कंपन्या कुठल्या असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोला, असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिल आहे. जसं रस्ते, वेदांता आहे तसं याबाबत देखील मी आवाहन करतो की दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
'अमुक अमुक मोठे नंबर दिले गेले, थोडा अधिक अभ्यास आपण केला तर कळेल. या ट्रीपचा अभ्यास केला तेव्हा कळालं की महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम होता, तो 4 दिवसांचा असायला हवा होता. 4 दिवसांसाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 10 कोटी प्रत्येक दिवशी खर्च करण्यात आला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टरचा उपयोग केला. जेव्हा चार्टर विमान घेतलं तेव्हा ते वेळेवर पोहोचायला घेता की उशीरा जायला?', असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
