#

Advertisement

Wednesday, January 25, 2023, January 25, 2023 WIB
Last Updated 2023-01-25T12:44:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"ताईं'चे नावही चर्चेत....

Advertisement

पुणे : पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स वाढलेला असताना भाजपसह राष्ट्रवादी, कॉंग्रेस तसेच शिवसेनेनेही या जागेवर दावा केला आहे, अशा स्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तसेच बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनीही ही जागा लढवावी, अशी चर्चा आहे.
पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकासाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणी होत असताना पिंपरी-चिंचवडची जागा भाजपची असल्याने ती भाजपचे सोलापूरचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या भोसरी येथील कन्या ऍड. कोमलताई साळुंखे यांच्यासाठी द्यावी, अशी मागणी होत आहे. ऍड. कोमलताई साळुंखे यांनी पालिका निवडणूक यापूर्वी लढविलेली आहे तसेच शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तसेच बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा दांडगा संपर्क भोसरी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात आहे. मातंग समाजातून त्यांना मोठा पाठिंबा असला तरी सर्वपक्षीय संपर्क तसेच जनमाणासांशी संपर्क आणि भाजपची पार्श्‍वभूमी ही त्यांची बदलस्थाने पाहिली तर त्यांना संधी दिली गेल्यास ही जागा भाजप सहज जिंकेल, असा दावा बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनीही केला आहे.

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीची चर्चा झाली आहे तर भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव कळवले आहे. परंतु, जगताप यांच्या घरातील उमेदवारांकडून निवडणुकीस नकार दिला जात असल्याचे समजते त्यामुळे चिंचवड मतदार संघासाठी भाजपची अन्य काही नावं पुढे येत आहेत. यापार्श्‍वभूमीवर सोलापूरचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे नावही पुढे केले जात आहे. विशेष म्हणजे ढोबळे यांचाच स्वतंत्र गट असलेल्या बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही अशी इच्छा व्यक्‍त केली आहे.

ही नावे चर्चेत.....
कसबा मतदार संघातील आमदार मुक्‍ता टिळक आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांची अधिसूचना 31 जानेवारीला जारी होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मतदान 27 फेब्रुवारीला होणार आहे.
कसब्यातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे,
कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मोहन जोशी तसचे भाजपकडून माजी नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांची नावे चर्चेत आहेत. तर, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील कुटुबांतील व्यक्‍तींसह अन्य नावांमध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या नावाचीही चर्चा झाल्याची सांगितले जात आहे.