Advertisement
भोसरी : मुलांना विकसित होऊ घ्या, त्यांना नाजूक बनवू नका आधुनिक जगता येणाऱ्या
संकटाना सामोरे जाण्यासाठी त्यांना आतापासूनच सक्षम करा, शाळा आपले काम करीतच आहे
परंतु शिक्षकांनी शिकवल्यानंतर ते योग्य आहे का, हे तपासण्याची जबाबदारी पालकांचीही
आहे. शिक्षणाला महत्त्व असले तरी काम हेच ज्ञानाचे प्रमाणपत्र आहे. कष्ट हाच
सर्वोत्तम गुरू आहे, असा सल्ला शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी
मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला.
भोसरी येथील शाहू शिक्षण संस्थेच्या
अनुलक्ष ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या राणी पुतळाबाई वुमन्य लॉ कॉलेज, ओऍसिस इंग्लिश
मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन शनिवारी (दि.21) मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरण
झाले. शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार
महेशदादा लांडगे संचालीका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, महाराष्ट्र ऑल्मिपीक संघटनेचे
अजय साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव
ढोबळे बोलत होते.
ते म्हणाले की, इंद्रायणी काठावरील सामान्य पालकांच्या
सहकार्यातून सुरू झालेली शाळा आज 20 वर्षांची झाली आहे. खेळ, चित्रकला, संगीत याकडे
पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या मुलांशी संवाद साधा, लेकरांच्या आनंदासाठी
आपल्या व्यापातून वेळ काढा, मुलांचे आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करा, सात्विक आहार
द्या, मुलांना बागेत उद्यानान किरायला न्या, मुलांच्या प्रश्नांना उत्तरे द्या,
आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख त्यांना होईल, यासाठी प्रयत्नशील रहा.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ऍड. कोमलताई साळुंखे, अजय साळुंखे यांच्या हस्ते मातंग समाजाचे नेते सचिन वाघमारे, समाजसेवक किशोर अहिरे, नगरसेवक विलास मडिगेरी, आरपीआयचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय करगळ, प्रियंका धोतरे, डीएमएलटी आरोग्य विभागाचे बसवराज हिंगे आदीं मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राथमिक तसेच माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "हिंदुस्थानमधील विविधेतून एकता' या थिमवर आधारित विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. चिमुरड्यांनी लोकगीत, कोळीगीत, चित्रपटसंगीत आदींवर नृत्यकरीत सर्वांची मने जिंकली. लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी बेळगावर सिमावादावर प्रकाश तसेच देशाच्या एकात्मेवर नाट्य सादर केले.
यावेळी लॉ कॉलेजच्या प्राचार्या बिनी थॉमस शिक्षिका प्रफुल्लता निगडे, पूजा शिंदे, माधुरी भोडके, आशा भामरे, रूपाली शहारे तसेच विद्यालयाच्या शिक्षिका हर्षदा पाटोळे, कृष्णाली सुरळकर, सरोज वाघमारे, यास्मीन शेख, प्रगती ताजणे, रूक्सार मुलाणी, जयश्री गवळी, राजश्री कुलकर्णी, स्नेहल भगत, दीपक रणपीसे, अभिषेक सर, सुरेखा मॅडम, केतकी खोल्लम, प्रिया चंदनखेडे, चित्रकला रणखांबे, प्राची देशपांडे, दर्शना पाचकंठी, शाईन अनसारी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्नेह संमेलन सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक विशाल खंदारे यांनी पार पाडली. सुत्रसंचालन वसुधा गोडसे यांनी केले.
आमदारांबाबत "ताई' म्हणाल्या....
शाळेच्या कॅम्पसमध्ये महिला लॉ कॉलेज, फॅशन डिझाइन इन्स्टीट्यूट, ज्युनिअर कॉलेज आहे या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांनी विद्यार्थिनीचे प्रमाण मोठे आहे. दादांसारखा लोक प्रतिनिधी आहे म्हणूनच महिला, तरुणी भयमुक्त शिक्षण घेऊ शकतात, मुलांना शाळेत येण्यासाठी या परिसरात चांगले रस्ते, शुद्ध पाणी आणि अखंडीत वीज पुरवठा, या मूलभूत सुविधा देऊन आमच्या भगिनी नगरसेविका ---- यांनीही मोठे काम केले असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी नमूद केले.

