#

Advertisement

Thursday, January 19, 2023, January 19, 2023 WIB
Last Updated 2023-01-19T17:32:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"ओऍसिस'चे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी...

Advertisement

भोसरी : येथील शाहू शिक्षण संस्थेच्या अनुलक्ष ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या राणी पुतळाबाई वुमन्य लॉ कॉलेज, ओऍसिस इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, शनिवारी, दि. 21 या संमेलनाचे उद्‌घाटन शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच माजी मंत्री लक्ष्णराव ढोबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संचालीका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली. सदर वार्षिक स्नेह संमेलनास उपस्थित रहावे, असे आमंत्रणही त्यांनी दिले आहे.
भोसरी परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरु असल्याची माहिती संचालीका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. सध्या, सदर स्नेह संमेलनाची तयारी जोरदार सुरू असून शिक्षक विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांची तयारी करून घेत आहेत. शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण आहे.