#

Advertisement

Wednesday, January 25, 2023, January 25, 2023 WIB
Last Updated 2023-01-25T13:19:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चिंचवड जागेवरुन आघाडीत मतभेद?

Advertisement

पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्यानं चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे भाजपबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील चिंचवडच्या जागेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले, की पुण्यात दोन पोट निवडणूक होत आहेत. महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची जागा आम्ही लढावी आणि चिंचवडच्या मतदारांचा देखील तो हक्क आहे की ही निवडणूक आम्ही लढावी. काल (मंगळवारी 24 जानेवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, एकनाथ खडसे हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळेस सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली. पण चिंचवडची निवडणूक शिवसेनेकडे असावी आणि मागच्या निवडणुकीत सुद्धा राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी निवडणूक लढले होते, फार चांगली झुंज दिली होती. यावेळी ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.