#

Advertisement

Wednesday, January 25, 2023, January 25, 2023 WIB
Last Updated 2023-01-25T13:15:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिंदे आणि फडणवीस यांना सरकार स्थापन पत्र देण्यात आले नव्हते? राजभवनाने दिले धक्कादायक उत्तर

Advertisement

मुंबई : ठाकरे गटाने शिंदे, फडणवीस सरकारच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण घटनापीठासमोर आहे. हे प्रकरण घटनापीठासमोर असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. 
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले. शिवसेनेतील अनेक आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे गटाने या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणावर घटनापीठात सुनावणी सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे, फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.