#

Advertisement

Monday, January 30, 2023, January 30, 2023 WIB
Last Updated 2023-01-30T11:28:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

थेट मतदान केंद्रावरच शुभांगी पाटील यांच्याकडून प्रचार?

Advertisement


अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज पाच जिल्ह्यात मतदान पार पडत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे  आणि महाविकास आघाडीच्या पुरुस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात शुभांगी पाटील यांच्या मतदान केंद्रांना भेटीगाठी सुरू आहेत. यावेळी शुभांगी पाटील मतदारांना हात जोडून मतदान करण्याची विनंती करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. शुभांगी पाटील मतदारांना हात जोडून मतदान करण्याची करत विनंती करत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर मतदार केंद्रावर उपस्थित असलेल्या प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात शुभांगी पाटील मतदान केंद्रांना भेट देत आहेत.