#

Advertisement

Monday, January 23, 2023, January 23, 2023 WIB
Last Updated 2023-01-23T11:11:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांसोबत आंबेडकरांच जुनं भांडण, पण...,

Advertisement


मुंबई : 'शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली, आमचं फार जुनं भांडण आहे. शेजारचं भांडण नाही, नेतृत्वाचं भांडण नाही, विषयाचं भांडण आहे. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो, असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली.
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 
बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल. जाहीरनाम्यामध्ये मंडल आयोग हे आम्ही लागू करू अशी घोषणा होती. दुर्दैवाने त्यावेळी होऊ शकले नाही. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण झाले आहे, यासाठी आम्ही चळवळ सुरू केली. पण ही चळवळ गिळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लढत राहिलो. उमेदवार निवडून येणे हे पक्षाच्या हातात नसून लोकांच्या हातात आहे. त्याला उमेदवारी देणे हे पक्षाचे काम आहे, असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. 
ईडीच्या मार्फत देशातील राजकीय नेतृत्व संपवले जात आहे. त्याने खरंच पैसे खाले असेल तर त्याला जेलमध्ये घेऊन जा, कोर्ट त्याला शिक्षा देईल. पण कोर्टात जायचं नाही आणि फक्त नेतृत्वावर जो आक्षेप आहे, प्रतिमा डागळण्याचा जो भाग आहे. तो हा धोकादायक प्रकार आहे, आपण काय अमरपट्टा घेऊन आलो नाही. एक दिवस नरेंद्र मोदी यांचा सुद्धा अंत होणार आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षात लिडरशीप संपवली आहे. वरती कुणालाच येऊ दिलं नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.