Advertisement
मुंबई : 'आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरून अजित पवार यांना फटकारलं.
वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी कुणी किती जागा लढायच्या हे अजून ठरवायचे आहे. ते ठरल्यानंतर निर्णय घेऊ. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे नागपूरला सुद्धा अर्ज भरला होता तो मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला जागा सोडली. त्याने जे करायचं नाही ते केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली त्यांना सोडली होती. पण आमचा माणूस नाही असं म्हटलं नाही. आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं.
