Advertisement
पुणे : कसबा विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आधीच स्पष्ट केल आहे. गेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली भूमिका त्याला कारण दिलं आहे. त्यामुळे भाजपने ही आक्रमक होत आज निवडणूक नियोजनाची बैठकीत घेतली आहे.
कमळ हे चिन्हच आमचा उमेदवार असेल असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पुणे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन स्पष्ट केलं आहे. तुल्यबळ इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप नेमकी कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न आहे, मात्र, उमेदवार पार्लिमेंटरी बोर्ड ठरवेल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मात्र, बैठकीत बूथ कमिटीपर्यंत प्रचाराच नियोजन कसं करायचं? याचं नियोजन केलं असल्याच सांगत बिनविरोधसाठी प्रयत्न करूच मात्र निवडणुकीच्या ही तयारीत आम्ही आहोतच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे..
