#

Advertisement

Tuesday, January 24, 2023, January 24, 2023 WIB
Last Updated 2023-01-24T11:14:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड

Advertisement

ठाणे: महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.
विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे.