Advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्याच्यावर अनेक रील देखील व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर अमृता यांचा असाच एक रील व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचं नाव 'आज मै मूड बना लेया' असे आहे. याच गाण्यावर अमृता फडणवीस यांनी हूक स्टेप करतानाचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी टिकटॉक स्टार बरोबर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. रियाझ अली असं या टिकटॉक स्टारचं नाव आहे. अमृता फडणवीस यांच्याबरोबरच्या डान्सचा व्हिडिओ रियाझ अलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रियाझ अलीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटोही त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.
