#

Advertisement

Thursday, January 19, 2023, January 19, 2023 WIB
Last Updated 2023-01-19T12:33:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

विधानपरिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

Advertisement

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पहायला मिळाले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघासह 5 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सत्यजीत तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. नाशिक- शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. या उमेदवारांची अधिकृत घोषणा काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदारा जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.