#

Advertisement

Saturday, January 28, 2023, January 28, 2023 WIB
Last Updated 2023-01-28T11:54:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

फडणवीस पुस्तक लिहतील त्यावेळेस कळेल !

Advertisement

पुणे : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहे. जयंत पाटील यांच्या या दाव्यावर भाजपकडून अजूनही खास अशी प्रतिक्रिया उमटलेली नाही, पण, 'काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही. देवेंद्र फडणवीस मॅच्युर आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहतील त्यावेळेसच कळेल की नेमकं काय झालं' असं प्रत्युत्तर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने आढावा बैठक घेतली यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासून एकदा ही देशात राष्ट्रपती राजवट लागली नाही. आम्ही मोदींचे वारस असल्यामुळे कोण काय बोलतो ते बघितलं नाही. काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही (पहाटेचा शपथविधी). देवेंद्रजी mature आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहितील त्यावेळेसच कळेल की नेमकं काय झालं, असं म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.