Advertisement
पुणे : 'आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्रित लढल्या तरी 150 जागा येतील आणि आम्ही मविआसोबत मिळून लढलो तर 200 जागा आरामात जिंकू, सी व्होटरचा सर्व्हेही तेच सांगतोय. म्हणूनच आता दोन्ही काँगेसनी ठरवायचं आपण चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचे ते' असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सल्लाच दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडीमधील नाराजीवर भाष्य केलं.
शरद पवारांसोबतचे मतभेद मी केव्हाच सोडून दिले आहेत. त्यामुळे मविआने सोबत जाताना माझ्या बाजुने तरी कोणताही किंतु परंतु नाही तसंच जेव्हा आम्ही सेनासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच असं ठरवलंय की एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही हे तारतम्य पाळावं, असा सल्लाही आंबेडकरांनी संजय राऊत यांना दिला.
दरम्यान ईडी, सीबीआय, आयटी या तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भितीपोटी 500 कोटीच्या वर मालमत्ता असलेल्या तब्बल 7 लाखाच्या कुटुंबीयांनी देश सोडल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
