Advertisement
मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये तेजी निर्माण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 500 अंकाची वाढ झाल्याने 60 हजारांवर सेन्सेक्स सकाळपासूनच बाजारात तेजीत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स थोड्यावेळापूर्वी 60 हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2023 आणि 2024चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेअर मार्केटमध्ये मात्र जोरदार उसळी घेताना पहायला मिळाले आहे. अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये मरगळ आली होती.
आज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स 60 हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारामन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या 10 मिनिटांत 600 अकांनी सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळाले आहे.