#

Advertisement

Saturday, February 11, 2023, February 11, 2023 WIB
Last Updated 2023-02-11T12:12:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीला रामराम ! प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीला रामराम ठोकून अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी पक्षप्रवेश केला होता. कोरोनाच्या काळात त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींना मदत केली होती. मात्र 2 वर्षातच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी 7 जुलै 2020साली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.  प्रिया बेर्डे यांच्याबरोबर  अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे, अभिनेता विनोद खेडेकर, निर्माता संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक सुधीर निकम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.