#

Advertisement

Wednesday, February 22, 2023, February 22, 2023 WIB
Last Updated 2023-02-22T11:19:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पहाटेचा शपथविधी झाला नसता तर ...

Advertisement


पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
पहाटेच्या शपथविधी हा घडवून आणला होता, असा खुलासा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आज पवार यावर बोलले आहे.  शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती.