Advertisement
मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. शिंदे गट पुन्हा एकदा उद्धव गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गट आता बीएमसीमधील शिवसेना कार्यालय आणि दक्षिण मुंबईतील शिवालय या पक्षाच्या कार्यालयावर दावा करण्याच्या तयारीत आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आधी बीएमसीचे शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याची योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट लवकरच बीएमसी आयुक्तांना पत्र देऊन शिवसेनेच्या कार्यालयावर दावा करणार आहे. सध्या दोन गटातील वादामुळे बीएमसीमधील या कार्यालयाला कुलूप आहे. मात्र, नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून त्यावर हक्क सांगण्याची तयारी सुरू झाली आहे.
