Advertisement
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने होकार दिला आहे. यावेळी कोर्टाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 1 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. 2 आठवडे ठाकरे गटावर कारवाई न करण्याचे आदेशही ठाकरे गटाला देण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार सुनावणी झाली. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवली आहे. 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश ?
कोर्टाची शिंदे गटाला नोटीस, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातच होणार सुनावणी
ठाकरे गटाला शिंदे गट व्हीप बजावणार नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार
सुनावणी सुरू असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार
व्हीप जारी करणार नाही, शिंदे गटाची कोर्टात ग्वाही
