Advertisement
मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोला लगावला आहे. जेव्हा राज्यात सत्तांतर झाले तेव्हा सर्वांनाच वाटलं होतं की फडणवीस मुख्यमंत्री होतील पण काय झालं? असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. भाजप आमदारांना त्याच वेळी बंड करायचं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं वरून आदेश आहेत, असं काही करू नका. वरच्या दोन माणसांना कळालं तर काही खर नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांनी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांच्या निकालावरून देखील भाजपला टोला लगावला आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्येही भाजपचे उमेदवार पडल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचा निकाल लागू द्या मग सांगतो पुण्यात काय काय झालं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
