Advertisement
सोलापूर : पुण्यातील
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. 26) मतदान
झाले. पुण्यात झालेली ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आली. आता, यावर माजी
मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता
पक्षाचाच विजय होईल, आस मला विश्वास असल्याचे ढोबळे यांनी म्हटले आहे.
कसबा
आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रतिक्रिया देताना
भाजपचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. दोन्ही ठिकाणी भाजपचाच उमेदवार
निवडून येईल. ज्या ठिकाणी नियमभंग झाल्याच्या तक्रारी आहेत तेथे कायदेशीररीत्या
कारवाई होईलच तसेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत होता,
या आरोपांना सडतोड उत्तर देताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही भाजपची संस्कृती
नसल्याचं म्हटलं आहे. विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची
परंपरा जपण्याकरिता अवघे आयुष्य पणाला लावले आणि रक्ताळलेल्या वाटवेरून चालताना
बलिदानाच्या रक्ताची रांगोळी काढत आपल्या जीवाचा नैवेद्य हिंदवी स्वराजासाठी
कुर्बान केला, अशा शुरविरांच्या इतिहासचा विसर आरोप करणाऱ्यांना पडला आहे. जे
मुळातच विचारांनी अंध, अपंग आहेत, त्यांना हिंदू धर्म आणि त्याचा इतिहास समजणे अवघड
आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाचे विचार आणि संपूर्ण घराण्याची
प्रतिष्ठा विरोधकांच्या पायावर वाहणाऱ्यांना हिंदू धर्म काय कळणार? आयोधाच्या
रामाचे चंद्रदर्शन घेन हिंदुत्वाची नक्कल करणारी माणसे किती बेईमान आहेत, नकलेतून
अकलेचे प्रदर्शन करणारी नाटकी माणसं लोकांना केंव्हाच समजली आहेत. केवळ हिंदुत्वावर
डोळा ठेऊन हिंदूच्याच विरोधकांना जाऊन ते मिळत असतील तर अशा बेईमान, गद्दार,
विश्वासघाती, शेवाळलेल्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवली मतदारांनी पुण्यातील
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानातून दाखविली आहे, असा मला ठाम विश्वास
असल्याचे ढोबळे यांनी म्हटले आहे.
