Advertisement
पुणे : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्याची माझी तयारी आहे, मला इतरांचं माहिती नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. समजा पुढे आम्ही एकत्र लढलो तर पुढची निवडणूक नक्कीच वन साईडेड होईल. कारण वंचितला मानणारा मोठा वर्ग आहे. वंचितला महाविकास आघाडीसोबत घ्यायची माझी वैयक्तिक तयारी आहे. मात्र मला इतरांचं माहित नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जित पवार यांनी शिवसेनेमध्ये उद्धभवलेल्या बंडावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना त्याचवेळी सावध केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि खरी चूक तिथेच झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी पण उद्धव ठाकरे यांना बंडाबाबत कल्पना दिली होती, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
