Advertisement
पुणे : शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केलं होतं, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुर्दैवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
निलेश माझिरे हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनामध्ये प्रवेश केला.
