Advertisement
चिंचवड: चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपचे उमेदवार मनोहर पाटील यांचा अर्जच बाद झाला आहे. उमेदवारी अर्जात सूचक अनुमोदक न दिल्यामुळे आप उमेदवार मनोहर पाटील यांचा अर्ज बाद ठरला आहे, त्यामुळे आपवर मोठी नाचक्की ओढावली आहे. मनोहर पाटील यांचा निवडणूक अर्ज बाद झाल्यानंतर आपचे निरीक्षक हरीभाऊ राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. निवडणुकीआधीच झालेल्या पक्षाच्या नाचक्कीची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उमेदवारच बाद झाल्यामुळे आप कुणाला पाठिंबा देणार? याकडे लक्ष लागलं आहे. चिंचवडमध्ये एकूण 40 उमेदवारांनी अर्ज भरले, त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. भाजपच्या अश्विनी जगताप या मुख्य उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्यामुळे डमी उमेदवार असलेले शंकर जगताप यांचा अर्ज नियमानुसार अवैध ठरला. आपचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचं नामनिर्देशन पत्र अपूर्ण असल्यामुळे त्यांचाही अर्ज बाद ठरला.
