#

Advertisement

Friday, February 24, 2023, February 24, 2023 WIB
Last Updated 2023-02-24T11:54:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पुण्यात मनसेला खिंडार..

Advertisement

पुणे :  कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र तरी देखील मनसेचे काही कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करताना आढळून आले होते. यातील सात कार्यकर्त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र त्यानंतर आता पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडले असून,  40 ते 50 मनसैनिकांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.  सात कार्यकर्त्यांच्या हाकालपट्टीनंतर कसबा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. या कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे.