#

Advertisement

Friday, February 24, 2023, February 24, 2023 WIB
Last Updated 2023-02-24T12:04:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कोल्हापुरातील कणेरी मठात शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

Advertisement

कोल्हापूर : जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथला हा प्रकार आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. यातील अद्यापही 30 गायींवर उपचार सुरू आहेत. 

श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली.