#

Advertisement

Monday, February 6, 2023, February 06, 2023 WIB
Last Updated 2023-02-06T12:43:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

...तर टिळकांच्या घरात उमेदवारी देतो !

Advertisement

पुणे :  कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी टिळक कुटुंबाची इच्छा होती. मात्र पुण्यात टिळक कुटुंबाला डावलून भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाना साधला होता. आता नाना पटोले याच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कसबा मतदारसंघाच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? असं थेट आव्हानाच चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना केलं आहे. तसेच चिंचवडमध्ये आम्ही घरातल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, मग तिथे तुम्ही उमेदवार का दिला असा सवाल पाटील यांनी केला आहे.

मी गप्प बसलो....
भाजप मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटलं होतं. त्यामुळे पक्षाने मला तिकिटाबाबत विचारणा करूनही मी गप्प बसलो. मात्र त्यांनी रासने यांना तिकीट दिलं. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल असं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.