#

Advertisement

Monday, February 6, 2023, February 06, 2023 WIB
Last Updated 2023-02-06T12:58:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

'संपत्ती वाढली नाही, कागदपत्रं तपासा'

Advertisement

पुणे : दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1-1 खासदाराचा समावेश आहे. यातल्या महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटींची वाढ झाल्याचं या अहवालाक नमूद करण्यात आलं आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीमध्ये 20 कोटींची, प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीत 10 कोटींची, भावना गवळी यांच्या संपत्तीत 6 कोटींची वाढ झाल्याचा अहवाल समोर आला आहे. दरम्यान आपल्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. माझ्या संपत्तीची कागदपत्रं तपासून पाहा. ही माहिती खोटी असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

कोणाच्या संपत्तीमध्ये किती वाढ ?
सुप्रिया सुळे- 89 कोटींची वाढ
रावसाहेब दानवे- 20 कोटींची वाढ
प्रतापराव जाधव- 10 कोटींची वाढ
भावना गवळी- 6 कोटींची वाढ