#

Advertisement

Tuesday, February 28, 2023, February 28, 2023 WIB
Last Updated 2023-02-28T12:33:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बिहारमध्ये पण एक औरंगाबाद , ते भाजपला चालते का?

Advertisement

औरंगाबाद : बिहारमध्ये पण एक औरंगाबाद आहे, तिथं भाजपचे खासदार आहे. मग ते औरंगाबाद भाजपला चालते का? या अधिवेशनात ठराव घ्या.. आणि नाव बदलून टाका. तुम्हाला औरंगाबाद नको म्हणून तुम्ही महापुरुषांच्या नावात बदल केला. आता या शहरांचाही करुन घ्या. जी 20 साठी शहर सजवले. मात्र, दोन 2 दिवस शहर सजवून काय साध्य केले. शहराच्या नामांतराला माझा विरोध कायम आहे. मात्र, याचा जाती धर्माशी संबंध नाही. काही लोकं जाणिपूर्वक मुद्दा भरकवट आहेत. आम्ही औरंगजेब सोबत नाव जोडतो म्हणून आम्ही पाकिस्तानात जावे असेही लोक आम्हाला सांगतात, असा आरोप  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मलिक अंबर यांच्या नावावरून औरंगाबादचे नाव अंबराबाद करून टाका असे जलील यांनी सुचवले आहे. फक्त बाळासाहेब आले. राजनीतीचे दुकान उघडलं ते म्हणाले मी या शहराचे नाव संभाजी नगर करणार. या वरून त्यांनी 30 वर्ष घाणेरडे राजकारण केले असा आरोप जलील यांनी केला. औरंगाबाद  शहर आणि जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर  करण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे. मात्र, जलील यांनी या वादात नवा ट्विस्ट आणला आहे. नामांतर विरोधात आंदोलन जाहीर करण्याची शक्यता आहे.