Advertisement
मुंबई : मनसेने पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिलं असून, ते पत्र त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
'आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र ! हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते.
कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल...
