Advertisement
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी झाली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे. आणखी एक उमेदवार होते, ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते, ते म्हणजे हिंदू महासंघाचे आनंद दवे.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत स्टार उमेदवार आनंद दवे यांना 296 मते मिळाली आहेत. त्यांच्या यानिवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. दरम्यान, या पराभवनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे. पण याचा पच्छात्ताप नाही. कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजपच्या विरोधात मतदान केले आहे. मागील वेळेस या प्रभागात मुक्ताताईंना 20000 चे मताधिक्य मिळाले होते. या वेळेस भाजप येथून 1400 मतांनी मागे पडला. तर बेगडी हिंदुत्वाच्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारणे आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे याचा राग आमच्यामुळे व्यक्त झाला, असेही ते म्हणाले.
अभिजित बिचुकले यांना 4 मतं
कसबा पेठ पोटनिवडणुकांमध्ये नशीब आजमावण्यासाठी राजकारणी म्हणवणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही मैदानात उतरले. पण बिचुकले आतापर्यंत मतं मिळाली तर किती? कसब्यातून आनंद दवेआणि अभिजित बिचुकले हेही अपक्ष म्हणून उतरले होते. तर अभिजित बिचुकले यांना आतापर्यंतच्या निकालांमध्ये अवघी 4 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी याना डावलून लोकांनी मला निवडून द्यावं मी विकास करेन असं म्हणणाऱ्या बिचूकलेंना काही मतं मिळणंही अवघड झालं आहे.
