#

Advertisement

Thursday, March 2, 2023, March 02, 2023 WIB
Last Updated 2023-03-02T17:54:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

भाजपविरोधात मतदान झाले.., मतदार जागृत होत आहे

Advertisement

मुंबई : 'चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे यांना जास्त मतं मिळाली. भाजपच्या विरोधात लोक मत देत आहे, याचा आकडा वाढला आहे. ती मतं एकत्र करणे हे मोठे आवाहन आहे. जर दोन्ही मतांची एकत्र बेरीज केली तर भाजपविरोधात मतदान झाले आहे. मतदार आता जागृत होत चालला आहे' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
'पोटनिवडणुकीमध्ये विजय झाल्यामुळे आनंद झाला आहे. लोक आता भाजपच्या तावडीतून बाहेर पडतात, हे बऱ्याच दिवसांनी कसबा मतदारसंघातून आता दिसून आले आहे. आतापर्यंत काही दिवसांपूर्वी शिक्षक पदवीधर महासंघाच्या निवडणुकीचे निकाल हे बोलके होते. आता पोटनिवडणुकीमधून सुद्धा लोकांनी दाखवून दिले आहे. हे मोठे आणि आश्चर्याचे चित्र आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 
टिळक यांच्या घराण्याला तिकीट नाकारलं. वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. जोपर्यंत काम होतं तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला. अकाली दल, ममतादीदी,जयललीता यांचा वापर करून फेकून दिलं तेच टिळक कुटुंबासोबत केलं आहे. गिरीश बापट यांच्या उमेदीचा काळ पाहिला आहे. ते एक कार्यकर्ते म्हणून लढत होते. बापट यांच्या प्रचाराचा फोटो पाहिला, मनोहर पर्रिकर यांना सुद्धा असं प्रचाराला आणलं होतं. पण त्यांच्या मुलाला तिकीट नाकारलं. सहानुभूती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.