Advertisement
कोल्हापूर : किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं असं म्हटत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत त्यांनी भाजप नेते सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिंदे, फडणवीस सरकार तसेच सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वतः विक्रांतचे पैसे कुठे गेले आहे विचारणार आहे. मी त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
