#

Advertisement

Tuesday, February 28, 2023, February 28, 2023 WIB
Last Updated 2023-02-28T17:17:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

एमपीएससीचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले पहिला

Advertisement

पुणे : एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रमोद चौगुले हा 633 मार्कांसह राज्यात पहिला आला आहे, तर शुभम पाटीलला 616 मार्क मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मेत्रे पहिली आहे, तर ओव्हरऑल सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. 
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.प्रमोद चौगुले राज्यसेवा 2021 च्या अंतिम निकालामध्ये राज्यात प्रथम आला आहे. 405 पदांसाठी परीक्षा दिनांक 7, 8, 9 मे 2022 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रमोद चौगुले हे 2020 च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आले होते, त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती. प्रमोद चौगुले हे मुळचे सांगलीचे असून ते सध्या नाशिकमध्ये उद्योग आणि उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.