#

Advertisement

Wednesday, March 1, 2023, March 01, 2023 WIB
Last Updated 2023-03-01T12:22:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आमदार अश्विनी जगताप...फलक झळकले

Advertisement


पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच चर्चेत आली. रविवारी दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यानं चिंचवडमध्ये तिरंगी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं चित्र चिंचवड मतदारसंघात दिसून येत आहे. 
पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाच्या आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक झळकवल्याचं पहायला मिळतं आहे. चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मात्र त्यापूर्वीच चिंचवडमध्ये मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली अशा अशयाचे फलक लावण्यात आले आहेत.