#

Advertisement

Tuesday, March 21, 2023, March 21, 2023 WIB
Last Updated 2023-03-21T10:07:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन

Advertisement

नागपूर : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी मागितली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात आज सकाळी पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. दोन वेळा हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला होता. फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली. एकापाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यामुळे नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. पण त्याने हे फोन कॉल केले नाही अशीच माहिती दिली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करत आहे.