Advertisement
परळी : पंकजा मुंडे यांनी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांसह मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. बीडच्या परळीत जलजीवन मिशन योजनेच्या कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक असं आवाहन केलं. तसंच यावेळी पंकजा मुंडेंनी एक खळबळजनक गौप्यस्फोटसुद्धा केला. 2019 च्या निवडणुकीत ताई तुम्ही महिला आहेत म्हणून आम्ही मत दिलं नाहीत. असं शेजारच्या गावची लोकं म्हणाले, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझं काही चुकलं का ? माझ्यात काही खोट आहे का ? तुम्ही एकजुटीने साथ द्यायला पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. बीडच्या परळी मतदार संघात मुंडे बहीण भावाकडून जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या भूमीजनासाठी चढाओढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंकजा मुंडे या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरल्याचे चित्र देखील निर्माण झाल आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की तुमच्या ताईमध्ये काय खोट असेल तर सांगा.की नको बाबा ताईचं नाव घ्यायला नको. लाजच वाटती नाव घ्यायला. असं काही असेल तर सांगा. काही माझ्याकडून चुकलं का ? माझ्यात काही खोट आहे का ? माझ्यामुळे काय नुकसान झाला आहे का ? असे प्रश्नही त्यांनी विचारले. शेजारच्या गावात गेले तर ते म्हणाले ताई तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून मतदान केलं नाही. एवढा निधी देऊन सुद्धा? महिला काय करू शकत नाही, महिला विकास करू शकत नाही का ? जेवढं तुमच्या पुरुषांनी दिलं नाही, तेवढं ताईंनी दिलं..तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता त्याच्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हणतात का ? असा सवाल करत तुम्ही एकजुटीने साथ द्या. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला लगावत, 2024 च्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना साद घातली.
