Advertisement
नाशिक : आज नाशिकमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते ते म्हणाजे लालकृष्ण आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे तेव्हाच त्यांनी मला विचारलं तुला कोणतं खातं हवं आहे? अशी आठवण यावेळी गडकरी यांनी सांगितली.
पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. राजकारणात मी ज्यांच्या नेतृत्वात काम केले त्या गोपीनाथ मुंडे यांचा मला अभिमान आहे. मी भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. मुंडे यांनी मला त्यावेळी विचारले तुला कोणतं खातं पाहिजे. त्यावेळी मला त्यांनी बांधकाम खातं दिलं, आणि त्याच काळात पुणे-मुंबई महामार्गाचं काम झाल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
