#

Advertisement

Saturday, March 18, 2023, March 18, 2023 WIB
Last Updated 2023-03-18T11:54:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कृषी मंत्र्यांकडून 5 मिनिटांत नुकसानाची पाहणी

Advertisement

जालना  :  गारपीटीसह पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. अशात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाच मिनिटांत पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे बीडहून भोकरदनकडे जात होते. त्यावेळी त्यांनी वडिगोद्री येथे रस्त्याकडेला असलेल्या एका शेतात गव्हाच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळं काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मदतीची मागणी करतोय. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार आले आणि अवघ्या पाच मिमिटांत पाहणी करून गेले. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.